मंगळवार, १५ जून, २०१०

बोथ वे आरसा आणि सावधगिरी



काही दिवसांपूर्वी इंटरनेट वर एक ईमेल खूप लोकप्रिय झाली होती. ' बोथ वे मिरर पासून सावधान ! ' आपाल्या आया-बहिणींना , मैत्रीणींना आणि बायका-पोरींना या आरश्यापासून सावध रहायला सांगा म्हणून. तुमच्यापैकी बर्‍याच जणांना आठवत असेल.

आता काहींना प्रश्न पडला असेल कि, ' बोथ वे मिरर ' म्हणजे काय ? तर त्यांच्यासाठी हि महत्त्वपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात देत आहे. :- 

' बोथ वे मिरर ' म्हणजे असा आरसा ज्याच्या दोन्ही बाजूने दिसतं. म्हणजे एका बाजूला उभे राहून आपण स्वतःचं प्रतिबिंब त्या आरशात बघत असू, तर आपल्या नकळत दुसर्‍या बाजूनेआपल्याला इतर कुणीही सहज बघू शकतं.





अशा आरसापासून सावध का रहायचं ? 
हल्ली बर्‍याचदा लोक शॉपिंग मॉल्स मध्ये कपडे खरेदीला गेले कि लगेच ते कपडे घालून बघतात. तिथे कपडे बदल्याची खोली असते, त्यात जो आरसा असतो, तॉ काही बदमाश लोक मुद्दाम असा बोथ वे  प्रकारचा लावतात आणि छुप्या कॅमेर्‍याद्वारे तुमचं चित्रीकरण करून ते विकतात. फार वाईट माणसं असतात ती.  असे प्रकार जास्त करून स्विमिङ पूल, जीम, वगैरे ठिकाणी होतात. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याबरोबर काही वाईट तर होत नाहिये ना ह्याची काळजी घ्या.  

तुम्ही पुढीलपैकी काही अतिशय सोप्या पद्धती वापरून त्या आरशाचं परीक्षण करू शकता. :-

१) लहानपणी लपंडाव खेळताना आपण जसा डोळ्याभोवती हात ठेवून भिंतीला तोंड लावून, १०,२०,३० ... म्हणायचो ते आठवतंय का, तसचं ज्या आरशाची तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल, त्या आरशाला तोंड लावून नीट निरखून बघितलंत, तर तुम्हाला पलीकडचं सगळं दिसेल. याचा अर्थ तो आरसा 'बोथ वे' आहे. आणि दुसरीकडून तुम्हाला कुणीतरी बघतंय.जर काहीही दिसलं नाही, तर याचा अर्थ तो आपला साधा आरसा आहे, मग तुम्ही बिनधास्तपणे कपडे बदलू शकता.



२) दुसरी एक सोपी पद्धत :
त्या आरशावर ' टकटक' , Knock Knock,  करून पहायचं, पोकळ आवाज आला तर, 'बोथ वे' आरसा. काहीही आवाज नाही आला तर साधी काच.

३) आणि सर्वात लोकप्रिय पद्धत : तुमच्या हाताच एखादं बोट त्या आरशावर टेकवा, आणि आता प्रतिबिंब पहा, जर त्या प्रतिबिंबा मध्ये आणि तुमच्या बोटात थोडंसं अंतर दिसलं तर काच खरी आहे. जर तुमच बोट आणि प्रतिबिंब दोन्ही चिकटलेली दिसली तर काच 'बोथ वे'.  

तेव्हा ह्या सोप्या पण महत्त्वपूर्ण पद्धती एकदा शिकून घ्या आणि आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना, नातेवाईकांना बगैरे जरूर सांगा. 


डिसक्लेमर : 
ह्या पद्धती मी स्वतः विकसित केलेल्या नाहीत.  एका ईमेलद्वारे त्या माझ्याकडे आल्या आहेत.  मला त्या माहितीपूर्ण वाटल्या, म्हणून मी  त्या इथे  दिल्या आहेत,  याची कृपया नोंद घ्यावी. 
त्यामुळे नो विश्वासार्हता अबाऊट ईट् !  पण ट्राय करून बघा, झाला तर फायदाच होईल तुमचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा