शनिवार, १९ जून, २०१०

गुगल अ‍ॅडसेन्स आणि आपली मानसिकता : तुम एक क्लिक दोगे, वो दस लाख देगा


' गुगल अ‍ॅडसेन्स ' :  इंटरनेट वरील जवळ-जवळ प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातला हा अविभाज्य घटक. इंटरनेट-व्यावसायिकांची हि हक्काची रोजी-रोटी. वेबसाईट धारक आणि ब्लॉग धारक यांचा तर हा जीव कि प्राण. सगळ्यांचा उद्देश एकच :- " भरपूर लोकांनी आपल्या वेबसाईटवर वा ब्लॉगवर यावं आणि भरपूर प्रमाणात टिचक्या मारून जावं " हि प्रत्येकाच्या मनातली सुप्त ईच्छा !




पण माणसाची मानसिकता कशी असते बघा. जेव्हा एखादा माणूस इंटरनेट वर नवीन असतो, तेव्हा तो इंटरनेट वर फिरता-फिरता , एखाद्या ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर जातो, तेव्हा तो त्याला आवडणार्‍या किंवा महिती हवी असेल्या सगळ्या लिंक्स वर, इमेजेस् वर क्लिक करतो, अगदी गुगल  अ‍ॅड असो  किंवा खासगी  अ‍ॅड. त्याला तेव्हा महिती नसतं कि आपल्या क्लिक करण्यामुळॅ या वेबसाईटच्या / ब्लॉगच्या  मालकाला धनलाभ होणार आहे.

पण हेच जेव्हा तो थोडा इंटरनेटच्या बाबतीत सुशिक्षित होतो, खास करून ' गुगल अ‍ॅडसेन्स ' च्या बाबतीत. तेव्हा तोच माणूस जेव्हा परत कधी कुठल्या वेबसाईटवर/ ब्लॉगवर जातो, तेव्हा  कधीही ,  कुणाच्याही  वेबसाईट्वर् / ब्लॉगवर गेल्यावर त्या गुगलच्या जाहिरातीवर टिचक्या मारत नाही. ऊलट आपला हात लागून चुकुन सुद्धा एखाद्या अ‍ॅड वर क्लिक होऊ नये याची तो पुरेपुर काळजी घेतो. आपण सुद्धा कधी कधी (बर्‍याचवेळा ) कळत-नकळत पणे असं करतो.



 हिच गोष्ट 'अ‍ॅफिलिएट प्रोग्राम्स' बाबत सुद्धा लागू होते, एखाद्या माणसाच्या 'अ‍ॅफिलियेट लिंक' वर आपण क्लिक केलं आणि मग एखाद्या वेबसाईटवर रजिस्टर झालो, तर ज्याच्या लिंकवर आपण क्लिक करून रजिस्टर झालो त्याला आयते पैसे मिळतील, म्हणून मग , हुशार लोक त्या लिंक वर कधीच क्लिक करत नाहीत. त्यांना त्या वेबसाईटवर जायचंच झालं तर ते , त्या माणसाचा ' रेफरल आय डी ' त्या लिंकमधून  काढून टाकतात  आणि  मग  नुसत्या ' डोमेन नेम ' वर क्लिक करून मग रजिस्टर करतात, जेणेकरून त्या ' रेफरर ' ला त्याचं कमिशन  मिळायला नको. 

का बरं असं करतो मनुष्य ? 
का आपण  दिलखुलास पणे दुसर्‍यांच्या ब्लॉग्स वर, वेबसाईटवर जाऊन तिथल्या गुगल जाहिरातींवर क्लिक्स करत नाही ?
 
का आपण ' रेफरर' ला त्याचं कमिशन मिळू देत नाही ?



" आपल्यामुळॅ दुसर्‍याचा आर्थिक फायदा होणार,  दुसर्‍या माणसाला  आपल्यामुळे  पैसे  मिळणार "   हे आजच्या सुशिक्षित माणसाला सहन होत नसावं का ? 

काय वाटतं तुम्हाला ?  कृपया शेअर करा...
धन्यवाद !

६ टिप्पण्या:

  1. अगदी योग्य लेख आहे! सगळ्यांची मानसिकता ही अशीच आहे. हा ब्लॉग आणि आपली लिहायची पद्धत या दोन्ही गोष्टी मला मनापासून आवडल्या.

    उत्तर द्याहटवा
  2. हाहाहा.... अगदी मनोमन पटलंय. खरंच ही वृत्ती मराठी माणसाला प्रगती करम्यापासून रोखत असते. हिंदी, इंग्लंजीतील अनेक ब्लॉगर्स एकमेका सहाय्य करू या तत्वाने एकमेकांचे ब्लॉग हिट्स वाढवत असतात आणि गूगलला येडे बनवत असतात. आपण कधी सुधारणार..

    उत्तर द्याहटवा
  3. मला नाही मिळालं तर चालेल पण तुलाही मिळता कामा नये, अशी खेकडा वृत्ती, दुसरं काय?

    एखाद्या ब्लॉगवरच्या अ‍ॅडसेन्स जाहिरातींवर सारख्या क्लिक मारल्या तर गुगल ब्लॉगरला वॉर्निंग देतं, म्हणून मी वारंवार नाही पण महिन्यातून दोन तीन क्लि्क्स माझ्या आवड्त्या ब्लॉग्सवरील अ‍ॅडसेन्सवर देत असते. ’फुकट काही देऊ नये आणि फुकट काही घेऊ नय”, हे तत्व पाळावं. जर एखादा ब्लॉग आपल्याला फुकटात माहिती देत असेल, तर त्याबदल्यात आपल्याकडून एक-दोन जाहिरातींवर क्लिक मिळवण्याचा त्यांना नक्कीच हक्क आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. " आपल्यामुळॅ दुसर्‍याचा आर्थिक फायदा होणार, दुसर्‍या माणसाला आपल्यामुळे पैसे मिळणार " हे आजच्या सुशिक्षित माणसाला सहन होत नसावं का ?

    काय वाटतं तुम्हाला ?
    स्पष्ट आणि खर खर सांगायचं तर उत्तर आहे "नाही"
    मुळात तसा नि तेवढा विचार करत बसायला त्याच्या कडे कदाचित वेळ हि नसतो नि बऱ्याच जणांना गुगल अ‍ॅडसेन्स म्हणजे नक्की काय ह्याची पण प्रामाणिक पणे माहिती सुद्धा नसते.आणि ज्याला तो असतो, त्याला जर बीडच्या गाडीत बसायचे असेल तर वेन्गुर्ल्याची गाडी भरली आहे का मोकळी हे बघत बसण्यात त्याला काहीही स्वारस्य नसते.
    मुळात हे शहरी जग हे स्वार्थाने भरलेले नि पूर्णपणे व्यवहारी आहे.वैचारिक भूक भागणे हि सुशिक्षित समाजाची गरज असते पण त्या साठी त्याला इंटरनेट ह्या माध्यमाचीच आवश्यकताच असते असे बिलकुल नाही.मात्र मिळत असलेल्या माहितीमधून,ज्ञाना मधून जर काही खरोखरचा ठोस लाभ होणार असेल किंवा होतो किंवा अर्थलाभ होणार असेल तर मात्र तो हि गोष्ट केवळ त्याच्या स्वार्थापोटी बिनचूकपणे,आणि आठवणीने करतो.मी स्वतःहि त्याला बिलकुल अपवाद नाही. थोडक्यात आपला ब्लॉग किंवा संकेतस्थळ हे त्या दृष्टीने,त्या योग्यतेचे बनविणे,तो दर्जा सदैव राखणे हि त्या ब्लॉगरवर जबाबदारी असते आणि त्यांना अगदी कितीही वाटत असले तरी त्या कठीण परीक्षेत बहुसंख्य ब्लॉगर नापास होत असतात.

    मी स्वतः शेयर बाजाराच्या व्यवहाराशी निगडीत असलेल्या क्षेत्रात काम करीत असल्याने त्या तुलनेत जास्त संवेदनाशून्य जगात वावरत असतो.तेथे माझ्या पाहण्यात काही अशा फ्री साईट्स आहेत कि जे लोक वर्षानुवर्षे सर्वसामान्य लोकांना अतिशय निरपेक्ष पणे ज्ञानार्पण करत असतात/आहेत.मी सुद्धा त्या साईट्स वर अगदी रोज नियमित भेट देऊन तेथील गुगल जाहिरातींना त्यांचे देणे नियमितपणे देतो.त्यात "माय मरो,पण मावशी जगो" फक्त हाच स्वार्थी हेतू असतो,आणि तो का असू नये?तो असणारच.
    दुसरे अजून एक निरीक्षण असे कि काही ठिकाणी जेथे त्या जाहिरातींना प्रतिसाद द्यावासा वाटतो तेथे त्या ब्लॉग धारकाने त्याच्या ब्लॉगची रचनाच अशी काही करून ठेवेली असते कि त्याचे सुरुवातीचे पहिले पान पूर्ण उघडे पर्यंत तो प्रचंड वेळ घेत राहतो त्या मुळे,नमनालाच एवढे घडाभर तेल गेल्याने पुढचा उत्साह पूर्णपणे मावळतो.ह्याचे आत्ता येथे एक चटकन आठवलेले नमुन्या दाखल उदाहरण म्हणजे श्री.प्रशांत रेडकर ह्यांचा ब्लॉग.खरे तर त्यांनी दिलेली/देत असलेली माहिती व त्यांचा एकूणच ब्लॉग हा अतिशय सुंदर व वैशिष्ट्य पूर्ण आहे.तथापि एक अति सर्वसामान्य वाचक म्हणून मला आलेली व येत असलेली हि एक अडचण मी प्रामाणिक पणे येथे नमूद केली आहे.
    शनिवार रविवार हा मला सध्या तसा सुटीचा वार असल्याने आपल्या पाठोपाठच्या लेखांवर अति सविस्तर प्रतिक्रिया देणे शक्य झाले हा आजच्या संक्रांतीचा एक योग.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  5. छान लेख आहे..
    मी स्वतःतरी असा कधीच करत नाही..... मी दिलखुलास पणे जाहिरातीवर क्लिक करत असतो.....
    www.marathi-tech.blogspot.com

    उत्तर द्याहटवा